Akurdi News: आकुर्डीत मोफत नेत्र तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – अजित शितोळे व आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या मार्गदर्शनाखाली, देसाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी, मोतीबिंदू लेन्स, मोफत शस्त्रक्रिया, मोफत औषधे व चष्मे वाटप असे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.

आकुर्डीतील विवेकनगर येथे 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शिबिर होणार आहे. शिबिरात मोतीबिंदू असल्याने निदान झाल्यास हडपसर येथील एच. व्ही. देसाई रुग्णालयात त्याची शस्त्रक्रिया होणार आहे. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन आयोजक अजित शितोळे यांनी केले. अधिक माहितीसासाठी 9373330633 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.