Al Qaeda : अमेरिकेने केला जवाहिरीचा खात्मा; काबूलमध्ये डागले ड्रोन

एमपीसी न्यूज – महासत्ता अमेरिकेने 9/11 च्या हल्ल्याचा बदला 21 वर्षांनी पूर्ण केला. दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा खात्मा केला. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये लपून बसलेल्या जवाहिरीच्या घरावर ड्रोनव्दारे मिसाईल डागले आणि क्रूरकर्म्याचा अंत झाला.

 

तालिबानचा थयथयाट

अफगाणिस्तानच्या भूमीवर हल्ला करुन अमेरिकेने दोहा कराराचे उल्लंघन केले आहे, असा थयथयाट तालिबान सरकारने केला. तर अमेरिकेने जोरदार पलटवार केला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देऊन तालिबानने चूक केली आहे. यापुढे अशी चूक करु नये असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

 

9/11 च्या हल्ल्यात जवाहिरी एक मास्टरमाईंड होता. निरपराध अमेरिकन नागरीकांची हत्या त्याने केली होती.आता न्याय झाला असून जवाहिरीचा खात्मा केला आहे. दहशतवादी हल्ले करणार्यांना अमेरिका कधीच माफ करीत नाही, अशी प्रतिक्रीया राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.