Alandi : श्रीराम मंगल अक्षता कलशाचे आळंदीमध्ये उत्साहात स्वागत

एमपीसी न्यूज – अयोध्येतून सुपूजित केलेल्या अक्षतांचा कलश मागील 15 दिवसांपासून (Alandi) आळंदी व परिसरातील मंदिरांत दर्शनासाठी ठेवण्यात येत आहे.

मरकळ, सोळू, धानोरे, पिंपळगाव, घोलपवस्ती, थोरवेवस्ती, दत्तमंदिर, केळगाव, आळंदी गावठाण इत्यादी अनेक गाव वस्त्यांमध्ये दर्शनासाठी मंगल कलश ठेवण्यात आलेला आहे.श्रीराम मंगल अक्षता कलशाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे .

अनेक सामाजिक संस्था , गणेश उत्सव मंडळे ,रहीवासी सोसयटी या कलश यात्रेत सहभागी होत असून सर्व नागरीकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर राममय होत आहे. रामभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन संयोजकाकडून करण्यात आले आहे .

Today’s Horoscope 18 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत आळंदीतील प्रत्येक घरात निमंत्रण पत्रक व प्रभू श्रीरामाची प्रतिमा व अक्षता वाटप होणार आहे.22 जानेवारीला प्रत्येक घरात 5 दिवे लावावेत व रांगोळी काढावी , भगवा ध्वज प्रत्येक घरावर लावावा तसेच मंदीरांमध्ये महापूजा, किर्तन, प्रवचनाचे, महाआरतीचे नियोजन करावे , असे विश्व हिंदू परिषदेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानात सहभागी होण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्याशी संपर्क करावा ,असे या अभियानाचे संयोजक  गणेश गरूड, अशिष जोशी , चैतन्य सुडे यांनी आवाहन (Alandi)  केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.