Pune News : गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी श्रीनिवास घाडगे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी श्रीनिवास घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांची बदली करण्यात आली असून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश आज गृहविभागाने काढले आहेत. त्यामध्ये दोन पोलीस उपायुक्त आणि तीन सहायक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेले अधिकारी ( कंसात कुठून कुठे)

संग्रामसिग निशानदार (पोलीस उपायुक्त नाशिक शहर ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर), समाधान पवार (पोलीस उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई ते पोलीस अधीक्षक अन्न व औषध प्रशासन, मुंबई), श्रीनिवास घाडगे (नियुक्तीच्या प्रतीक्षेत ते पोलीस उपायुक्त पुणे शहर गुन्हे शाखा), प्रेरणा कट्टे (सहायक आयुक्त पिंपरी चिंचवड ते सहायक आयुक्त पुणे शहर), विवेक जोशी (सहाय्यक आयुक्त मीरा भाईंदर ते अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई), सुजाता शेजाळे ( पोलीस उपअधिक्षक जात प्रमाणपत्र पडताळणी मुंबई ते सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई) श्रीहरी पाटील (पोलीस उपअधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे ते पोलीस निरीक्षक पिंपरी चिंचवड)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.