Pune News : पवारांच्या घरावर हल्ल्याची घटना महाराष्ट्राला न शोभणारी – राजेश टोपे

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर काही आंदोलकांनी काल  दगडफेक केली. चपला फेकून त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले. सर्वपक्षीय नेत्यांनी पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे काल पुण्यात होते. तरीदेखील या घटनेचा निषेध केलाय. 

राजेश टोपे म्हणाले, शरद पवार यांच्या घरासमोर घडलेली घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारी आणि घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केल आहे. त्याचबरोबर जी घटना झाली आहे ती जाणीवपूर्वक घडवण्यात आली असून ज्यांनी हे सगळं केल आहे त्या लोकांवर अतिशय कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

शरद पवारांच जर आतापर्यंतच राजकारण पाहिलं ते त्यांनी नेहमीच एसटी आणि एसटी कामगार यांच्या बद्दल नेहमी सहानभूती दाखवली आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक मागणी मध्ये शरद पवारांनी सहभाग घेतला असून नेहमीच शरद पवार साहेबांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

त्याचबरोबर मंत्रिमंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी पगार वाढ देखील जाहीर केली आहे. परंतु एसटी विलीगीकरणाचा विचार आत्तापर्यंत देखील कधीच झाला नाही. त्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. तरीदेखील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगला निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तो स्वीकारून आणखीन पुढे काही नवीन मार्ग काढता येतो का हे पाहणं महत्त्वाचं होतं. परंतु घरावर दगडफेक करणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो असं स्पष्ट मत राजेश टोपे यांनी मांडल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.