Vadgaon Maval : बाबुराव वायकर यांच्या वतीने पोटोबा महाराज मंदिरास 71 किलो धातूची गजलक्ष्मी मूर्ती भेट

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या वतीने 71 किलो वजनाची धातूची गजलक्ष्मी मूर्ती वडगाव मावळचे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिराला नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते भेट दिली.

यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,सचिव अनंता कुडे, विश्वस्त सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, ॲड अशोक ढमाले, अरुण चव्हाण,किरण भिलारे, विणेकरी बबन भिलारे, पुजारी मधुकर गुरव,बाळासाहेब तुमकर,रवींद्र तुमकर,विठ्ठल ढोरे,शांताराम कुडे व महिला भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज (शुक्रवार, दि.19) पहाटे काकड आरती पुजेचा मान बाबुराव वायकर परिवाराकडे होता. त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून कार्तिक स्नान काकडा आरती समाप्ती निमित्त वायकर यांनी 71 किलो वजनाची धातूची गजलक्ष्मीमूर्ती श्रींच्या चरणी अर्पण केली. यावेळी पोटोबा महाराज देवस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून वायकर आप्पांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यापूर्वी आषाढी एकादशीनिमित्त देहू येथील संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार,चैत्र पौर्णिमेनिमित्त खेड तालुक्यातील लिंबगाव दावडी येथील जय मल्हार नामफलक, एकविरा देवी मंदिर पायथा मंदिराला कलश आणि नामफलक त्यांनी दिले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथाच्या बैलजोडीचे ते मानकरी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.