Chinchwad News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते गिरीश प्रभुणे यांचा मंगळवारी नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – भटके विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन कार्य करीत असलेले गिरीश प्रभुणे यांना नुकताच भारत सरकारच्या वतीने पद्मश्री किताब प्रदान करण्यात आला. सुमारे एकतीस संस्थांच्या सहभागातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा मंगळवारी (दि.23) नागरी सत्कार केला जाणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा सन्मान सोहळा पार पडेल.

या कृतज्ञता नागरी सत्कार सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर उषा ढोरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ह.भ.प. डॉ. नारायणमहाराज जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषद (भोसरी शाखा), महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य-कला अकादमी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), लायन्स क्लब भोजापूर गोल्ड, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, कलारंग प्रतिष्ठान, बंधुता प्रतिष्ठान, शब्दधन काव्यमंच, अक्षरभारती, समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड, दिलासा संस्था, पिंपरी-चिंचवड साहित्य मंच, गुणवंत कामगार विकास समिती, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती, गझलपुष्प पिंपरी-चिंचवड, सावित्रीच्या लेकींचा मंच, भूगोल फाउंडेशन (भोसरी), स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड), शिक्षकमित्र जिव्हाळा परिवार (भोसरी), ज्येष्ठ नागरिक संघ (चिंचवडगाव), एल्गार साहित्य परिषद, आशिया मानवशक्ती विकास संस्था, कष्टकरी संघर्ष महासंघ, स्वानंद महिला संस्था (पिंपरी-चिंचवड) अशा सुमारे एकतीस संस्थांच्या वतीने हा विनामूल्य सत्कार सोहळा संपन्न होईल. सर्व नागरिकांनी आवर्जून सत्कार सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक पुरुषोत्तम सदाफुले आणि मुरलीधर साठे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.