Talegaon Dabhade : शहराच्या स्वच्छतेसाठी काम करणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक

एमपीसी न्यूज – शहराच्या स्वच्छता, शुद्धीकरणासाठी जे कामगार झटतात त्यांचे आरोग्य देखील चांगले असले पाहिजे. त्यासाठी  ठेकेदारांनी त्या कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी व्यक्त केले. मे.अशोक एंटरप्रायझेस नगरपरिषदेचे स्वच्छता ठेकेदार यांचे वतीने तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचा-यांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी दिघे बोलत होते.

यावेळी नगर परिषदेचे नरेंद्र कणसे, मयूर मिसाळ, कैलास कसाब, प्रमोद फुले, सिद्धेश्वर महाजन, जयंत मदने, सतीश राउत,रवींद्र काळोखे, प्रवीण माने, रोहित भोसले, तसेच तपासणी करण्यासाठी आलेले साक्षी डायग्नोस्टीक सेंटरचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कंत्राटी कामगार उपस्थित होते.

यावेळी दिघे म्हणाले शासनाकडून मिळणा-या सुविधा कामगारांना भेटल्या पाहिजेत, कामगारांनी कायद्याप्रमाणे मिळणा-या आपल्या हक्कासाठी भांडले पाहिजे. मक्तेदारांनी आपल्या कामगारांचे पगार, प्राॅव्हींडड फंड, मेडिकल सुविधा दिल्या पाहिजेत. तसेच हे गाव आपले आहे. त्याची स्वच्छता, आरोग्य राखण्याचे काम आपले आहे या भावनेने कामगारांनी देखील काम केले  पाहिजे.

यावेळी मधुमेह, थायराॅइड, नेत्र तपासणी, रक्तदाब, अस्थमा, त्वचारोग आदी तपासण्या झाल्या. अमीन खान यांनी मनोगत व्यक्त केले. तर दिलीप गायकवाड यांनी सूत्र संचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.