Mhalunge Crime : कंपनीच्या 116 टायरचा अपहार केल्या प्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – टायर बनविणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या  कामगारांनी कंपनीने टेस्टिंगसाठी दिलेल्या 116 टायरचा अपहार केला. (Mhalunge Crime) ही घटना 27 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत सावरदरी येथील ब्रिस्टॉन कंपनीत घडला.

अमोल अनिल बोरसे (वय 27, रा. तळेगाव दाभाडे), कृष्णा ज्ञानेश्वर डांगे (वय 22, रा. मोशी), बन्सीलाल देवकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुरेश संपत पवार (वय 42, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी म्हाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

Pimple Guruv News : एकच फ्लॅट दोघांना विकला, कर्ज काढताना पडले पितळ उघडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल आणि कृष्णा हे ब्रिस्टॉन कंपनीत ऑफिस सहायक तर आरोपी बन्सीलाल हा चालक म्हणून काम करतात. (Mhalunge Crime) कंपनीत तयार केलेले टायर कोथरूड येथील ए आर ए आय येथे टेस्टिंगसाठी पाठवले जातात. 27 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत टेस्टिंगसाठी 116 टायर आरोपींच्या ताब्यात देण्यात आले होते. त्या टायरचा आरोपींनी अपहार करून कंपनीची फसवणूक केली. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.