Pune News : माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी घेतल्याचा आरोपावरून डेक्कन पोलीस ठाण्यात (Pune News) त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. प्रवीण चव्हाण यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये फिर्यादीकडून 1 कोटी 22 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

BHR घोटाळ्यात फिर्यादी हे आरोपी होते, त्यावेळी प्रवीण चव्हाण हे राज्य सरकारचे वकील होते. याच प्रकरणात प्रवीण चव्हाण यांच्याकडून फिर्यदीला वारंवार धमकी देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी केली गेली.

Crime News : खेड शिवापूरमध्ये कारमधून गांजा जप्त

याच प्रकरणवरून अखेर फिर्यादी सूरज सुनील झवर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात वकील प्रवीण चव्हाण , शेखर सोनाळकर आणि उदय पवार यांच्याविरोधात खडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सूरज झंवर यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. यावरुन अॅड. चव्हाण यांच्यावर फसवणूक आणि खंडणी (Pune News) सारख्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 166, 213, 384, 385, 386, 388, 506, 34, 120 ब अंतर्गत त्यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.