Hinjwadi : व्यावसायिकाला मारहाण करत दीड लाखांची सोनसाखळी लुटली

एमपीसी न्यूज – सहकार्‍याला घरी सोडण्यास जाणार्‍या एका व्यावसायिकाच्या मोटारीला धडक देत रिक्षातील दोघांनी व्यावसायिकाला मारहाण करत चार तोळ्यांची दीड लाखांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता हिंजवडीतील इन्फोसिस सर्कल फेज-2 येथे घडली.

मनोज कुमार (वय 47, रा. लाईप रिपब्लिक कोलते-पाटील, मारूंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षातील अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज कुमार गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता मोटारीने सहकारी नमिता जैन यांना त्यांच्या घरी सोडण्यास जात होते. इन्फोसिस सर्कल येथे त्यांच्या मोटारीला एका रिक्षाने जोरदार धडक दिली. रिक्षातील दोघांनी खाली उतरून मनोजकुमार यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याची 1 लाख 41 हजार रूपयांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.  हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.