Chakan : सहा ट्रकच्या काचा फोडून सुरक्षारक्षकांना मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पार्क केलेल्या सहा ट्रकच्या काचा फोडल्या. काचा फोडणा-यांना अडवणा-या दोन सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण केली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 3) रात्री मोहितेवाडी येथे घडली.

मंगलसिंग लखबीरसिंग (वय 23, रा. मोहितेवाडी शेलपिंपळ्गाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहितेवाडी शेलपिंपळ्गाव येथे पुना राची कार्गो मूव्हर्स प्रा. लि. ही ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. या कंपनीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या ट्रकच्या चार अनोळखी इसमांनी काचा फोडल्या. पार्किग परिसरात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक मंगलसिंग आणि अर्जुन काशिनाथ तिवारी यांनी तोडफोड करणा-यांना अडवले.

यावरून आरोपींनी दोन्ही सुरक्षारक्षकांना हाताने व काठीने मारहाण करून दुखापत केली. यामध्ये आरोपींनी सहा ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.