Khadaki News : बोपोडी-दापोडी येथील हॅरीस ब्रिजवरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – मुंबई – पुणे महामार्गावरील बोपोडी येथील मुळा नदीवरील हॅरीस ब्रिजवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.यासंबंधीचे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहेत.

पिंपरी – चिंचवडकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने हॅरिस ब्रिज लगतच्या नवीन पुलावरून न येता नवीन पुलाचे सुरुवातीस उजव्या बाजूकडे वळून जुन्या हॅरीस ब्रिजच्या डाव्या लेनकडून पुढे येऊन बोपडी चौकातून पुढे खडकी बाजार मार्गे पुण्याच्या दिशेने जातील.

भाऊ पाटील रोडकडून येणारी वाहने व पुण्याच्या दिशेने जाऊ इच्छिणारी वाहने हॅरीस ब्रिजच्या अंडरपासने पुढे न येता वि.भा. पाटील पुलावरून पुढे शिवाजी पुतळा चौक दापोडी येथून डावीकडे वळून पुढे फुगेवाडी पुलावरून उजवीकडे वळून बोपोडी चौक – खडकी बाजार मार्गे पुण्याच्या दिशेने जातील किंवा आंबेडकर चौकातून पुढे साई चौक – चर्च अंडरपास – चर्च चौक पुढे पुण्याच्या दिशेने जातील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.