Mumbai News : मध्य रेल्वेने केला एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 24.58 कोटी महसूल जमा 

एमपीसी न्यूज – एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 2022 मध्ये रु.24.58 कोटी भाडे – व्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसूल आणि रु.105.74 कोटींची पार्सल महसूल मध्य रेल्वेने जमा केले आहे.अशी भाडे-व्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसूल आणि पार्सल महसूलामध्ये मध्य रेल्वेने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

भाडे – व्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसूल

आर्थिक वर्ष 2022 – 23 मध्ये (एप्रिल ते ऑगस्ट) मध्य रेल्वेची कामगिरी नेत्रदीपक राहिली असून, गेल्या वर्षीच्या भाडे – व्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसूलात याच कालावधीतील रु.7.61 कोटींच्या तुलनेत रु.24.58 कोटी विक्रमी महसूल जमा झाले आहे, ज्यात तब्बल 223 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

ऑगस्टमध्ये 628.46 लाख रुपयांच्या वार्षिक परवाना शुल्कासह 36 भाडे – व्यतिरिक्त (नॉन-फेअर) महसूल करार ई-लिलावाद्वारे देण्यात आले आहेत.

गाड्यांवरील जाहिराती, उदा. मेल/एक्स्प्रेस गाड्या, उपनगरीय गाड्या आणि लोकोमोटिव्ह ज्यांना मोबाईल मालमत्ता म्हणून संबोधले जाते, ते मध्य रेल्वेसाठी एक उत्तम महसूलाचे साधन ठरले आहे. ई-लिलाव अंतर्गत मुंबई विभागातील 33, पुणे विभागातील 38, नागपूर विभागातील 5 आणि भुसावळ व सोलापूर विभागातील प्रत्येकी 3 अशा एकूण 82 मोबाईल (फिरत्या) मालमत्ता तयार करण्यात आल्या आहेत.

पुणे विभागाने ऑगस्ट – 2022 महिन्यात 14 मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या 27 रेकवर ई-लिलाव करून जाहिरातींचे कंत्राट दिले असून 3 वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक रु.132.48 लाख महसूल नोंदविला आहे.

प्रचंड उपनगरीय रहदारी असलेल्या मुंबई विभागाने उपनगरीय ईएमयू रेकच्या आतील आणि बाहेरील भागात जाहिरातीद्वारे प्रत्येकी 42 मालमत्ता निर्माण केल्या आहेत. 5 वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक रु.35.56 लाख महसूलासह 38 ईएमयू रेकमध्ये लगेज रेक डिस्प्लेसह 8 निविदा देकार देण्यात आल्या आहेत.यामध्ये रु.231.65 लाख उत्पन्नाची नोंदणी करणाऱ्या 15 ईएमयू रेकवरील बाह्य जाहिराती आणि 20 ईएमयू रेकवरील अंतर्गत जाहिरातींचाही समावेश आहे.

पार्सल महसूल

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 (एप्रिल ते ऑगस्ट) मध्ये पार्सल आणि लगेज महसूलाच्या माध्यमातून रु.105.74 कोटींचे लक्षणीय महसूल देखील नोंदवले.ऑगस्ट – 2022 मध्ये, मध्य रेल्वेने 2.10 लाख टन पार्सलची वाहतूक केली आणि 21.12 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (ऑगस्टपर्यंत), वेळापत्रकानुसार पार्सल ट्रेनच्या 121 ट्रिपने रु. 8.32 कोटी महसूल मिळवले आणि 14 इंडेंट पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेनने 2.90 कोटी महसूल प्राप्त केले.

सध्या 89 सीटिंग कम लगेज रेक (SLR) आणि 12 व्हॅन पार्सल (VP) लीजवर आहेत, त्यापैकी 18 सीटिंग कम लगेज रेक (SLR) आणि एक पार्सल व्हॅन (VP) अलीकडेच ई-लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.