Chinchwad : प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 336 जणांवर कारवाई

Action against 336 persons violating administration rules

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवणाऱ्या आणखी 336 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने काढलेल्या नियमावलीला नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जातेय. हे चित्र दररोज होणाऱ्या कारवाईच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यात प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केले आहेत.

असे असले तरी सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत संचारबंदी लागू राहणार आहे.

नागरिकांनी गर्दी करू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच तोंडाला मास्क घालावा असे काही सुरक्षेचे नियम घालून दिले आहेत. नागरिकांकडून दिवसेंदिवस नियम मोडले जात आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई देखील केली जात आहे.

मंगळवारी (दि. 26) पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (31), भोसरी (23), पिंपरी (32), चिंचवड (35), निगडी (21), आळंदी (5), चाकण (5), दिघी (16), म्हाळुंगे चौकी (5), सांगवी (15), वाकड (43), हिंजवडी (27), देहूरोड (23), तळेगाव दाभाडे (21), तळेगाव एमआयडीसी (4), चिखली (23), रावेत चौकी (5), शिरगाव चौकी (5) एकूण 336 जणांवर कारवाई केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.