Chinchwad Crime : पोलिसांच्या कारवाईचा जोर ओसरला; शनिवारी 93 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर सरकारी आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर होणा-या कारवाईने जोर धरला होता. मात्र, महिन्याभरातच हा जोर ओसरला आहे. 100 ते 150 च्या आसपास होणा-या कारवाईचा आकडा शनिवारी (दि. 26) 93 वर आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या काळात पोलिसांकडून टाळेबंदीचे उल्लंघन करणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यानंतर टाळेबंदीमधून जसजशी शिथिलता येईल, तसतशी कारवाईची आकडेवारी देखील कमी झाली.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली झाली आणि कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात कारवाईने पुन्हा जोर पकडला. मात्र, एकाच महिन्यात पुन्हा हा जोर ओसरला आहे.

टाळेबंदीतून काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी काही आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि. 26) केलेली कारवाई

एमआयडीसी भोसरी (5), भोसरी (2), पिंपरी (0), चिंचवड (4), निगडी (7), आळंदी (1), चाकण (0), दिघी (14), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (18), वाकड (11), हिंजवडी (24), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (7), रावेत चौकी (), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.