Chinchwad Crime : केशवनगर येथे दोघांना मारहाण करून दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – चार जणांनी मिळून (Chinchwad Crime) दोघांना बांबूच्या काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत दुचाकी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी (दि. 7 मे) सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन वाजताच्या कालावधीत केशवनगर चिंचवड येथे घडली.

यश राजू जाधव (वय 20, रा. केशवनगर, चिंचवड), साहिल काकरिया अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी यश जाधव यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी घोलप, जॉनी जगताप, शुभम चौधरी, बदऱ्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad News : शस्त्र बाळगल्याचे एकाच दिवशी आठ गुन्हे दाखल; आठ जणांना अटक

पोलिसांनी (Chinchwad Crime) दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचा मित्र साहिल या दोघांना बांबूच्या काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. 60 हजार रुपये किंमतीची एक केटीएम दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Dighi News : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 21 आठवड्याननंतर प्रकरणाला वाचा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.