Chinchwad News : शस्त्र बाळगल्याचे एकाच दिवशी आठ गुन्हे दाखल; आठ जणांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाकड, हिंजवडी, निगडी आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी कारवाई करून आठ जणांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. याबाबत आठ वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या गुन्ह्यात अशोक मरिबा तुपेरे (वय 22, रा. वाकड) याला अटक केली आहे. त्याला पोलिसांनी ४ जानेवारी 2022 रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. त्याचा तडिपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. तसेच तो शस्त्र बाळगताना देखील आढळला आहे.

दुस-या गुन्ह्यात ओंकार उर्फ बंटी सुनील लोखंडे (वय 22, रा. चिंचवड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 200 रुपयांचा कोयता जप्त केला आहे. तिस-या गुन्ह्यात सनी गौतम गवारे (वय 20, रा. काळेवाडी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 500 रुपये किमतीची एक पालघन  जप्त केली आहे. चौथ्या गुन्ह्यात शुभम रामचंद्र पांचाळ (वय 21, रा. रहाटणी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 100 रुपयांचा एक कोयता जप्त करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलिसांनी फ्रान्सिस भास्कर दास (वय 29, रा. विनोदे वस्ती, वाकड. मूळ रा. वारजे माळवाडी, पुणे) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 100 रुपये किमतीचा एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. शस्त्र विरोधी पथकाने सांगवी येथे एक कारवाई करून विकास उर्फ विकी बाळू आडगळे (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे.

सांगवी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या गुन्ह्यात केविन प्रकाश ब्राह्मणे (वय 22, रा. पिंपळे गुरव) याला तर दुस-या गुन्ह्यात हजरत इस्माईल अब्दुल रफिक शेख (वय 24, रा. जुनी सांगवी) याला अटक केली आहे. दोघांकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.