Pimpri News : शहरातील ख्रिश्चन बांधवांनी साजरा केला ‘ईस्टर संडे’

एमपीसी न्यूज – येशू ख्रिस्ताने गुड फ्रायडेनंतर तिसऱ्या दिवशी मारणावर विजय मिळवला. येशू ख्रिस्त यांनी मरणावर विजय मिळवून पुढे 40 दिवस आपला संदेश जनमानसात दिला. या पुनरुत्थान दिवसालाच ईस्टर संडे म्हटले जाते. आजचा (रविवार, दि. 17) दिवस ईस्टर संडे म्हणून ख्रिश्चन बांधवांनी साजरा केला.

दयानंद ठोंबरे म्हणाले, ‘प्रभू उठला आहे खरोखर उठला आहे’ अशा शुभेच्छा देत ख्रिश्चन बांधवांनी आज शहरातील चर्चमध्ये मोठ्या उत्साहात ईस्टर सण साजरा केला. गुड फ्रायडे नंतर येशू ख्रिस्ताने तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवला. तो आजचा पुनरुत्थान दिवस म्हणजेच ईस्टर संडे होय.”

सकाळपासून सर्व चर्चमध्ये प्रार्थनेसाठी भाविकांनी गर्दी केली. येशूची प्रार्थना करत त्याचा पुनरुत्थान दिवस साजरा केला. गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढविण्यात आले. तो दिवस ख्रिश्चन बांधव गुड फ्रायडे म्हणून येशूची उपासना करतात. गुड फ्रायडेनंतर तीन दिवसांनी म्हणजेच रविवारच्या दिवशी येशूने मारणावर विजय मिळवून पुन्हा जीवन धारण केले. या दिवसाला ख्रिश्चन बांधव ईस्टर संडे म्हणून साजरा करतात.

ईस्टर संडे निमित्त ख्रिश्चन बांधवांची सकाळपासून लगबग सुरू होती. नवीन कपडे आणि आनंदाच्या वातावरणात सर्वांनी चर्च गाठले आणि येशूची प्रार्थना केली. येशूच्या पुनरुत्थानाबाबत आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.