India Corona Update : दिलासादायक ! सक्रिय रुग्ण संख्या घटली,186 दिवसांतील नीचांक 

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 26 हजार 964 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 34 हजार 167 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या मागील 186 दिवसातील निचांकी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 35 लाख 31 हजार 498 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 27 लाख 83 हजार 741 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.76 टक्के एवढा झाला आहे.

देशातील सक्रिय रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 3 लाख 01 हजार 989 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 383 कोरोना रुग्ण दगावले असून, भारतात आजवर 4 लाख 45 हजार 768 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 55 कोटी 67 लाख 54 हजार 282 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 92 हजार 395 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 82 कोटी 65 लाख 15 हजार 754 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.