UPSC : यूपीएससी परीक्षेत यश मिळविणाऱ्या तन्मयीचा सत्कार

एमपीसी न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत 224 वे स्थान प्राप्त करणा-या निगडी प्राधिकरणातील तन्मयी देसाई हिचा माजी नगरसेवक अमित गावडे यांच्या हस्ते आज (मंगळवारी) सत्कार करण्यात आला.

एलआयजी कॉलनीतील घरी जाऊन तन्मयीचा सत्कार करण्यात आला. वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य सुरेश वाडकर, सुरेश कर्डिले, दिनेश लिंगावत, चिंतामण देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

Tamanna Sheikh : महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश प्राप्त केलेली तमन्ना शेख हिचा सन्मान 

अमित गावडे म्हणाले, ”तन्मयीने चिकाटीने अभ्यास करत यशाला गवसणी घातली. पिंपरी-चिंचवडसह निगडी प्राधिकरणाची मान तीने उंचाविली आहे. तन्मयीने भावंडांकडे राहून मिळविलेले यश उल्लेखनीय व अनेकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. तिच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.