Ketki Chitale : पोलिस मला अटक कशी करू शकतात? केतकीची मुंबई हायकोर्टात धाव

एमपीसी न्यूज : गेल्या 23 दिवसांपासून अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. तिने आपल्या याचिकेत म्हंटले आहे, की ”तिला पोलिसांनी बेकायदा अटक केली असून, तिच्यावरील कारवाई देखील बेकायदा आहे. त्यामुळे मला नुकसान भरपाई देण्यात यावी.” तसेच, आजही तिचा जामीन अर्ज नाकारण्यात आलेला आहे. 

अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणांहून तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली होती. पहिल्यांदाच ती या प्रकरणावर सक्रिय झाली आहे. तिच्यावर झालेल्या कारवाईबाबत तिने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात तिने म्हंटले आहे, की ज्या लोकांनी तीच्या विरोधात फिर्याद दिली, त्यात एकही पवार नामक व्यक्ती नाही. तीच्या कवितेत पवार नामक व्यक्तीला उद्देशून पोस्ट होती. मग त्याच्या भावना दुखावल्या असल्या हे जरी गृहीत धरले तरी पवार नावाच्या व्यक्तीने तक्रार केली नाही. मग पोलिस मला अटक कशी करू शकतात? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. त्यामुळे माझ्यावर झालेली अटक कारवाई ही बेकायदा आहे’, असे तिने म्हंटले आहे.

Pradeep Bhide : वृत्तनिवेदक प्रदिप भिडे यांचे निधन;बातम्यांचा भारदस्त आवाज हरपला

केतकीचा (Ketki Chitale) तुरुंगातील मुक्काम अजून 9 दिवसांनी वाढला असून पुढील सुनवाई 16 जून रोजी होणार आहे. यासोबतच तिने आपल्या वकिलांमार्फत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळू नये म्हणून त्यांच्या  जामीनाविरुद्ध  केंद्रीय अन्वेषण विभागाच्या न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.