Corona World Update: एका दिवसात ‘विक्रमी’ 1 लाख 29 हजार 990 नवे रुग्ण तर 80 हजारपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Corona World Update: The highest 1 lakh 29 thousand 990 new patients in a single day, while more than 80 thousand corona free

एमपीसी न्यूज – जगात काल (गुरुवारी) आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 1 लाख 29 हजार 990 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर 80 हजार 831 रुग्ण काल दिवसभरात कोरोनामुक्त झाले. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी 48.44 टक्क्यांपर्यंत वाढली असून सक्रिय रुग्णांची टक्केवारी 45.69 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 66 लाख 97 हजार 763 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 93 हजार 127 (5.91 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 32 लाख 44 हजार 423 (48.44 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 30 लाख 60 हजार 213 (45.69 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 30 लाख 04 हजार 753 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 55 हजार 460 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

29 मे – नवे रुग्ण 1 लाख 25 हजार 511, मृतांची संख्या 4 हजार 872

30 मे – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 102, मृतांची संख्या 4 हजार 084

31 मे – नवे रुग्ण 1 लाख 08 हजार 767,  मृतांची संख्या 3 हजार 191

1 जून – नवे रुग्ण 1 लाख 03 हजार 050, मृतांची संख्या 3 हजार 017

2 जून – नवे रुग्ण 1 लाख 15 हजार 215, कोरोनामुक्त 1 लाख 07 हजार 201, मृतांची संख्या 4 हजार 669 

3 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 413,  कोरोनामुक्त 1 लाख 53 हजार 699, मृतांची संख्या 4 हजार 929

4 जून – नवे रुग्ण 1 लाख 29 हजार 990,  कोरोनामुक्त 80 हजार 831, मृतांची संख्या 5 हजार 499

अमेरिकेत सात लाखांहून अधिक कोरोनामुक्त

अमेरिकेत गुरुवारी 1,031 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 10 हजार 173 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 19 लाख 24 हजार 051 झाली आहे तर 7 लाख 12 हजार 252 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

ब्राझीलमध्ये एका दिवसात 1,492 कोरोना बळी 

ब्राझीलमध्ये गुरुवारी 1,492 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 34 हजार 039 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 15 हजार 870 झाली आहे तर 2 लाख 74 हजार 997 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. ब्राझिलमधील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मृतांच्या आकड्यांमुळे भीती अधिकच वाढली आहे.

मेक्सिकोत एका दिवसात 1092 कोरोनाबाधितांचा मृत्यू

मेक्सिकोत गुरुवारी एका दिवसात 1,092 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मेक्सिकोत कोरोनाबाधित मृतांची संख्या आता 11 हजार 729 झाली आहे. मेक्सिकोत कोरोना संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. मेक्सिकोत 1 लाख 01 हजार 238 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 73 हजार 271 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असले तरी गेल्या काही दिवसांत मृतांच्या आकड्यात लक्षणीय वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

चीनला मागे टाकत पाकिस्तान 17 व्या स्थानी

सर्वात आधी कोरोनाची लागण झालेल्या व कोरोना रुग्ण संख्येत सुरूवातीला सर्वप्रथम असलेल्या चीनला मागे टाकत पाकिस्तान आता 17 व्या क्रमांकावर पोहचला आहे. पाकिस्तानात काल 4,801 इतक्या नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85 हजार 264 झाली आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 1,770 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 30 हजार 128 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

भारतात काल (गुरूवारी) 275, इंग्लंडमध्ये 176, रशियात 169, कॅनडामध्ये 139 तर पेरूमध्ये 137 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. इटलीमध्ये 88, पाकिस्तानात 82, चिलीमध्ये 81, इराण 59 तर दक्षिण अफ्रिकेत 56 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 19,24,051 (+22,268), मृत 1,10,173 (+1,031)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 6,15,870 (+31,890), मृत 34,039 (+1,492)
  3. रशिया – कोरोनाबाधित 4,41,108 (+8,831), मृत 5,384 (+169)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 2,87,740 (+334), मृत 27,133 (+5)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,81,661 (+1,805), मृत 39,904 (+176)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,34,013 (+177), मृत 33,689 (+88)
  7. भारत – कोरोनाबाधित 2,26,713 (+9,889) , मृत 6,363 (+275)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,84,923 (+498), मृत 8,736 (+37)
  9. पेरू –  कोरोनाबाधित 1,83,198 (+4,284) , मृत 5,031 (+137)
  10. टर्की – कोरोनाबाधित 1,67,410 (+988), मृत 4,630 (+21)
  11. इराण – कोरोनाबाधित 1,64,270 (+3,574), मृत 8,012 (+59)
  12. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,52,444 (+767), मृत 29,065 (+44)
  13. चिली – कोरोनाबाधित 1,18,292 (+4,664), मृत 1,356 (+81)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,01,238 (+3,912), मृत 11,729 (+1,092)
  15. कॅनडा –  कोरोनाबाधित 93,726 (+641), मृत 7,637 (+139)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 93,157 (+1,975) मृत 611 (+32)
  17. पाकिस्तान – कोरोनाबाधित 85,264 (+4,801), मृत 1,770 (+82)
  18. चीन – कोरोनाबाधित 83,022 (+1), मृत 4,634 (0)
  19. कतार – कोरोनाबाधित 63,741 (+1,581), मृत 45 (0)
  20. बेल्जियम – कोरोनाबाधित 58,767 (+82), मृत 9,548 (+26)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.