Pune News : येरवडा स्मशानभूमी येथील शवदाहिनी 10 दिवस बंद

एमपीसी न्यूज – येरवडा स्मशानभूमी येथील शवदाहिनी क्रमांक 01 शनिवारपासून (दि.11) दहा दिवस बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शवदाहिनी बंद ठेवली जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

पुणे महानरपालिकेचे कार्यकारी अभियंता (विद्युत) यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. येरवडा स्मशानभूमी येथील शवदाहिनी क्रमांक 01 देखभाल दुरूस्तीच्या कामानिमित्त शनिवार (दि.11) ते मंगळवार (दि.21) या कालावधीत बंद राहणार आहे. दाहिनीतील खराब झालेल्या विटा व इतर कामे करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.