Pune News : येरवड्यात सराईत गुन्हेगाराचा हैदोस, दुचाकीची तोडफोड करत नागरिकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : येरवड्यात तीन जणांच्या टोळक्याने एका पस्तीस वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राचे वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. येरवड्यातील क्रांती मित्र मंडळ चौकाजवळ रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

साहिल संतोष सोनवणे, शंकर भगतथापा आणि त्याचा आणखी एक साथीदार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यंकटेशचनप्पा शेंगुटे (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

व्यंकटेशचनप्पा शेंगुटे हे येरवड्यातील रामनगर परिसरात राहतात. सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ते जेवण करून घरात मुलीशी गप्पा मारत बसले होते. यावेळी सराईत आरोपी साहिल सोनवणे आणि त्याचे दोन साथीदार त्या ठिकाणी आले. काही कारण नसताना त्यांनी फिर्यादी यांच्या बुलेटची तोडफोड केली.

फिर्यादीने याबाबत विचारणा केली असता लोखंडी हत्याराने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी याच परिसरातील आणखी एका दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.