Dahi handi: विद्यार्थ्यांनी लुटला दहीहंडीचा आनंद

एमपीसी न्यूज : रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले… विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी… विविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष… (Dahi handi) अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लॉवर इग्लिश मीडियम, लिटल फ्लॉवर विद्यालय व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद लुटला.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, लिटल फ्लॉवर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलम पवार,(Dahi handi) भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षिका ज्योती फर्तियाल, वृषाली कोकणे, दीपा गायकवाड, सुनीता ठाकूर, सोनाली आवळे, नम्रता रोटकर यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Swine Flu : कोरोनानंतर आता स्वाईन फ्ल्युचे संकट; शहरात 21 रुग्ण, दोघांचा मृत्यू

गोविंदा आला रे आला…  यासारख्या गाण्यावर नृत्य करत ते दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चिमुकल्यांसह शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते.(Dahi handi) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती फर्तियाल, विद्यार्थीनी अनुष्का कोलते व स्नेहा धाडवे यांनी, तर आभार विद्यार्थी भूषण जोगी याने मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.