Dehuroad News : ‘लॉकडाऊनमध्ये मोठे नुकसान, व्यापाऱ्यांना करमाफी द्या’

एमपीसीन्यूज : कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दुकाने बंद आहेत. पण, कर वसुली चालू आहे. दुकानांना व्यावसायिक कर आकारणी केली जाते. हॉटेलचालकांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. दुकाने बंद असताना कर कसा भरणार ?, कराचा भरणा करण्यासाठी व्यापा-यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे व्यापा-यांना करमाफी द्यावी, अशी मागणी अबुशेठ रोड व्यापारी संघटनेने देहूरोड कँन्टोन्मेंट प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत सुर्वे, उपाध्यक्ष सत्तार तांबोळी, सचिव अनिल खंडेलवाल, जलाल शेख, जितू गांधी यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांना निवेदन दिले आहे.

कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दुकाने बंद आहेत. पण, कर वसुली चालू आहे. दुकानांना व्यावसायिक कर आकारणी केली जाते. हॉटेलचालकांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. दुकाने बंद असताना कर कसा भरणार ?, असा सवाल सुर्वे यांनी उपस्थित केला आहे.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुलातील गाळे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे त्यांचे भाडे माफ करावे, हॉटेल व्यवसाय देखील अनेक दिवस बंद आहे. त्यामुळे पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांच्याकडे केल्याची माहिती सुर्वे यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, मदन सोनिगरा, ॲड. प्रवीण झेंडे, मिकी कोचर, उमेश जैन, महेंद्र सरोदे, धनराज शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.