Vadgaon News : ॲड.श्रेयस पेंडसेचा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – फसवणुकीचा व बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांच्या उपस्थितीत लग्न करून दुसऱ्या दिवशी बायकोला तिच्या माहेरी सोडून परागंदा झालेल्या नवरदेवाला मिळालेला अंतरिम जामीन रद्द करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी पीडित तरुणीच्या वतीने गुरुवारी वडगाव मावळ न्यायालयात करण्यात आली.

 

लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून वडगाव मावळ न्यायालयात दावा सुरू आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी ॲड. श्रेयस श्रीराम पेंडसे याला देण्यात आलेला अंतरिम जामीन रद्द करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज पीडित तरुणीच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केला.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक हे या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत.वडगाव मावळ येथे न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत पीडित तरुणीच्यावतीने सरकारी वकील ॲड.सापरे, ॲड.राम शहाणे, ॲड.जोसेफ फर्नांडिस यांनी न्यायालयात काम पाहिले. त्यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद न्यायालयात सादर केला. हा युक्तिवाद वाचण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली.त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणावरील पुढील सुनावणी एक सप्टेंबरला ठेवली.

 

संबंधित आरोपी पोलीस ठाण्यात बोलवून देखील उपस्थित राहिला नाही तसेच न्यायालयातील सुनावणीसही गैरहजर राहिल्याची बाब पीडित तरुणीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.