Talegaon Dabhade News : वादग्रस्त पोस्टबाबत अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ ग्रामीण ब्लॉकची तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून अभिनेत्री केतकी चितळे विरुद्ध राष्ट्रवादी असे समीकरण झाले आहे. केतकी चितळे विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ ग्रामीण ब्लॉकतर्फे मागणी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ ग्रामीण ब्लॉकच्या वतीने तळेगाव एमआयडीसी पोलिसांना रविवारी (दि. 15) निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या महिला ग्रामीण अध्यक्षा पुष्पा घोजगे, मनिषा नाणेकर, अलका शिंदे, ललिता कोतुळकर, सुवर्णा घोलप, मनिषा भसे, शुभांगी सावंत, मुक्ता पवार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुक पेजवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टमुळे सर्वत्र संतापजनक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे चितळेवर तात्काळ गुन्हा दाखल करून तिला अटक करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.