Talegaon Dabhade News : माजी नगरसेवक निखिल भगत यांच्यातर्फे 250 महिलांना शेगाव, शनी शिंगणापूर येथे देवदर्शन

एमपीसी न्यूज – गजानन महाराज यांचा प्रकट दिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक निखिल भगत यांच्यातर्फे यशवंतनगर, तपोधाम आणि परिसरातील तब्बल 250 महिलांना शेगाव येथील गजानन महाराज आणि शनी शिंगणापूर दर्शन घडवले. देवदर्शन घडवून आणल्याबद्दल महिलांनी भगत यांचे कौतुक करत आभार मानले. 

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून महिला भगिनी घरात बंदिस्त होत्या. महिलांना भक्ती यात्रेचा आनंद मिळावा या उद्देशाने माजी नगरसेवक निखिल भगत यांनी शेगाव येथील गजानन महाराज आणि शनि शिंगणापूर दर्शनासाठी 5 बसमधून 250 महिलांना घेऊन जाण्याचे योग्य नियोजन केले.

शुक्रवारी (दि.11) रोजी सायंकाळी तळेगावातून शेगावकडे पाच बस मार्गस्थ झाल्या. गजानन महाराज आणि शनि शिंगणापूर यांचे दर्शन घेऊन शेगाव येथे एक दिवस मुक्काम झाला. मुक्कामाची आणि जेवणाची सर्व व्यवस्था भगत यांनीच केली होती. रविवारी (दि.13) सर्व महिलांना घेऊन बस परत तळेगाव दाभाडे येथे आल्या. महिलांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून स्वत: निखिल भगत आणि त्यांचे सहकारी सर्व यात्रेत उपस्थित होते.

महिलांनी गजानन महाराज आणि शनि शिंगणापूरचे मनोभावे दर्शन घेऊन माजी नगरसेवक निखिल भगत यांचे कौतुक करत आभार मानले.

याबाबत माजी नगरसेवक निखिल भगत म्हणाले”  कोरोनामुळे महिला भगिनी दोन वर्षांपासून घरात बंदीस्त झाल्या होत्या. या महिलांना गजानन महाराज यांचा प्रकट दिन आणि महिला दिनाचे औचित्य साधून महाराजांच्या दर्शनाचे नियोजन करण्यात आले. मात्र, तळेगावात शुक्रवारी (दि.11) रोजी सायंकाळी जोरदार पाऊस आला होता. त्यामुळे महिलांना आपण शेगावला जावू की नाही अशी साशंकता वाटत होती. मात्र, सर्व महिलांना विश्वास देऊन विना विघ्न देव दर्शन झाले. त्यामुळे महिला भगिनींना मोठा आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप मोठे समाधान लाभले. ”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.