Dighi : नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात दागिने व वस्तू नीट दिल्या नाहीत, तसेच वडिलांच्या नावावरील प्रॉपर्टी विकून घर घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना दिघी येथे घडली.

पती सागर मारूती गायकवाड, सासरे मारूती गायकवाड (वय 50), सासू सुनंदा गायकवाड (वय 50) आणि वशी किरण साळुंखे (वय 22, सर्व रा. दत्त मंदीराजवळ, लेन नं. 11, विजयनगर, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 28 वर्षीय विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी 2019 ते 4 सप्टेंबर 2019 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी विवाहिता या घरी नीट नांदत नाहीत. त्यांना काम करता येत नाही. आई वडिलांनी लग्नात दागिने व वस्तू नीट दिल्या नाहीत. तसेच वडिलांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी विकून नवीन घर घेण्यासाठी पैसे घेऊन ये, तसेच इतर किरकोळ कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.