Punawale Crime News :  हुंडाबळी,  पतीला अटक सासु विरोधात गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज : वारंवार हुंड्याच्या पैशाची मागणी तसेच शारिरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेला आत्महत्या करण्यास भाग पाडले. याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे तर, सासुविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (दि.21) व्यंकटेश इम्पेरिया, पुनावळे या ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. 

राहुल देवराम पाटीदार (वय 31, रा. गुडगाव, मध्य प्रदेश) असे अटक पतीचे नाव आहे. तर, त्याची आई हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिलेचा भाऊ हर्ष बिहारीलाल पाटीदार (वय 30, बजरंगनगर, इन्दौर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या महिलेला तिचा अटक आरोपी पती व त्याची आई यांनी सतत पैशांची मागणी केली. तसेच, तिचा वारंवार शारिरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी अधिक तपास हिजंवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक यु आर खाडे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.