Pune News : वेल्ह्यात चालकावर गोळीबार, घटनेने खळबळ, दुचाकीस्वार तिघे हल्लेखोर फरार

एमपीसी न्यूज : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका पानटपरी चालकावर गोळीबार केल्याची धक्कादायक प्रकार  वेल्हे तालुक्यातील वांजळी गावात घडली. त्यामुळे पानटपरी चालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विलास नथु बोरगे (वय 24, वाजली गाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांजळी गावात दिलीप यांची पानटपरी आहे. रविवार दुपारी  दीड वाजण्याच्या सुमारास तिघेजण दुचाकीवर त्याठिकाणी सिगारेट घेण्यासाठी गेले होते. सिगारेट घेतल्यानंतर ते माघारी गेले. मात्र काही वेळातच ते पुन्हा दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यातील एकाने पिस्तूल काढून थेट विलास यांच्या दिशेने तीन राउंड फायर केले. त्यातील एक गोळी विलास यांच्या छातीत शिरल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. गोळीबाराची माहिती मिळताच वेल्हे पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर दुचाकीवरुन फरार झाले असून त्यांची छायाचित्रे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.