Dighi Crime News : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारची मद्यपीकडून तोडफोड

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारची एका मद्यपी तरुणाने तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना 13 ऑगस्ट रोजी दुपारी मॅगझीन चौक, दिघी येथे घडली. भरदिवसा अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशाल बाळासाहेब गोरडे (वय 34, रा. मॅगझीन चौक, दिघी) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी विशाल वारे या व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गोरडे यांनी त्यांची टाटा जेस्ट कार (एम एच 14 / जी ओ 8213) मॅगझीन चौकात एका दुकानाजवळ पार्क केली होती. आरोपी वारे एका मोपेड दुचाकीवरून आला आणि दुचाकी कारवर चढवून, कारच्या काचांवर लाथा मारून कारची तोडफोड केली. हा प्रकार सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.

दरम्यान, घटनेच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांनी गर्दी केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

गुंड प्रवृत्तीचे लोक स्थानिक लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या प्रकारात पोलीस आयुक्तांनी लक्ष घालून अशा गाव गुडांवर पोलीस प्रशासनाने लवकर कारवाई करावी,अशी भावना दिघी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.