Eco Friendly Ganpati : वास्तू डेव्हलपर्स आयोजित इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा उत्साहात

एमपीसी न्यूज – “पर्यावरण रक्षणाची जबाबदारी हि सर्वांचीच आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने यात योगदान दिले पाहिजे” असे प्रतिपादन सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंर शरद घड्याळे यांनी केले.
तळेगाव दाभाडे येथील गृह प्रकल्प बांधणाऱ्या प्रसिद्ध अश्या वास्तू डेव्हलपर्सच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या (Eco Friendly Ganpati)  कार्यशाळेचे आयोजन केले होते. लहान मुलांसाठी इको फ्रेंडली गणपती बनविण्याचे कार्यशाळेचे हे चौथे वर्षे होते. या कार्यशाळेचे उदघाटन घड्याळे यांच्या हस्ते झाले. या वेळी वास्तू डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर निलेश भोसले, संचालिका उज्वला भोसले, गौरव भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
असिस्टंट कमांडंर घड्याळे पुढे म्हणाले की,”वास्तू डेव्हलपर्सचे कौतुक अश्यासाठी कि त्यांनी या लहान मुलांना पर्यावरणाचे धडे दिले. कारण भविष्यात त्यांच्याच खांद्यावर देश घडविण्याची जबाबदारी आहे. आणि अश्या कामात निलेश भोसले या  बांधकाम व्यावसायिकाने पुढाकार घ्यावा हे अभिनंदनीय आहे.”

या कार्यशाळेत 56 लहान मुलांनी इको फ्रेंडली ( Eco Friendly Ganpati) गणपती तयार केले. प्रास्ताविकात वास्तू डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर निलेश भोसले यांनी या कार्यशाळेच्या मागे असलेली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे सांगितले. तसेच, मुलांचा मिळालेला उत्साह पाहून आनंद झाल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात याहीपेक्षा मोठ्या स्वरूपात अशी कार्यशाळा करण्याचा मानस बोलून दाखविला.
विद्या जाधव-राणे यांनी शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतः मातीचा गणपती बनवून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनीही सहजतेने मग अशा मूर्ती साकारल्या. वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती स्वतःला करता आल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर होता.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थिती दर्शविली. सरनाईक यांनी यावेळी उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवावे आणि इतरांनाही प्रेरित करण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळून आपला परिसर व आपले गाव स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. सरनाईक यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या लहान मुलांना प्रशस्ती पत्रक आणि भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
वास्तू डेव्हलपर्सचे उमेश भोसले, हर्षद जव्हेरी, अविनाश सावंत, महेश, वैभव कुलकर्णी, धंनजय अत्रे, गजानन घबाडे  यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ओंकार वर्तले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.