Eknath Shinde Update : शिंदे गटात आणखी ‘हे’ आमदार दाखल; शिवसेना नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

एमपीसी न्यूज – शिवसेना नेत्यांकडून पुकारलेल्या बंडामुळे संपुर्ण राज्य कोलमडून गेले आहे. बंडखोर आमदारांनी हिंदुत्वाला ढाल करून त्यांचे नेतृत्व आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. दरम्यान शिंदेगटात (Eknath Shinde Update) आज पाच आणखी आमदार सामील झाल्याने महाराष्ट्रातील राजकीय संकट आणखी गहरे झाले आहे.

दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांच्या गटात आणखी पाच जण सामील झाले आहेत. या वाढत्या संख्याबळामुळे शिंदेगटातची एकूण संख्या 46 वर पोहोचली आहे. यामध्ये रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह मुंबईतील दादर – माहिमचे आमदार सदा सरवणकर, सावंतवाडीचे दीपक केसरकर, दीग्रज मतदार संघाचे संजय राठोड, कुर्ला नेहरूनगरचे मंगेश कुडाळकर सुद्धा सामील झाले आहेत. शिवसेना नेतृत्वाच्या अगदी जवळचे मानले जाणारे हे आमदार शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

PCMC : सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या संस्थेला महापालिका तीन लाख देणार

मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांच्या या राजकीय घडामोडींवर आपले मौनव्रत सोडले आणि राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधन केले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना समोर येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले, तर सद्यस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करत जनतेला भावनिक साद घातली. तरीसुद्धा शिवसेना आमदारांची गळती सुरूच असल्याचे दिसत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणि कोण मिळवणार हे पाहणे सध्या महत्त्वाचे ठरणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मनात शंका

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत असतानाच शिवसेनेचे एवढे आमदार शिंदे यांच्याबरोबर कसे गेले याबाबत काँग्रेस,राष्ट्रवादीच्या मनात शंका निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल इतका असंतोष कसा ? (Maharashtra Political Crisis)  शिवसेनेचे आमदार तिकडे पाठविण्यात सेनेतील कोणी मुद्दाम खेळी करत काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच धोका दिला का अशी शंका दोन्ही काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.