Elon Musk : एलन मस्क विकत घेणार कोको – कोला कंपनी? सोशल मीडियावर खमंग चर्चा

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर महत्त्वपूर्ण प्लॅटफाॅर्म म्हणून ओळखले जाणारे ‘ट्विटर’ विकत घेतल्यानंतर एलन मस्क चांगलेच चर्चेत आले होते, याबाबत त्यांनी ट्विट करून सांगितले होते. पुन्हा एकदा एका ट्विटने उद्योजक मस्क यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मस्क यांनी आपण कोका – कोला कंपनी खरेदी करणार असल्याचे यामध्ये सांगितले आहे. 

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारे मस्क यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कारण देऊन ट्विटर कंपनी खरेदी केली. आता सुद्धा कोका – कोला का खरेदी करत आहोत याचे कारण सांगून त्यांनी कोका – कोला कंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एलन मस्क ट्विटमध्ये लिहितात, मी कोका – कोला कंपनी खरेदी करणार आहे. यामध्ये कोकेनचा पुन्हा वापर करता यावा यासाठी कंपनी खरेदी करणार आहे. या कंपनी खरेदीच्या ट्वीटनंतर एका तासातच तब्बल 8 लाख लोकांनी हे ट्विट लाईक केले. या ट्विटवर अनेक प्रतिक्रियांचा पाऊस सुद्धा पडत आहे. त्यामुळे ट्वीटरप्रमाणे एलन मस्क कोका – कोला कंपनी सुद्धा विकत घेणार का हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.