Environment Day : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व्यक्तीगत जीवनात पर्यावरणपूरक कृतिशील आचरण आवश्यक – आयुक्त राजेश पाटील

एमपीसी न्यूज – पर्यावरणाचा समतोल (Environment Day) राखण्यासाठी व्यक्तीगत जीवनात पर्यावरणपूरक कृतिशील आचरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक प्रमाणात वापर करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रविवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (Environment Day) भक्तीशक्ती चौक निगडी ते दापोडी तसेच दापोडी ते भक्तीशक्ती चौक निगडी दरम्यान सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते सायकल फेरीचे झेंडा दाखवून सूरुवात करण्यात आली. त्यावेळी शहरवासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. तसेच, पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

भक्तीशक्ती चौक निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापुसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, स्मार्ट सिटीच्या सचिव चित्रा पंवार, उपअभियंता सुनील पवार, अनिल सुर्यवंशी, संजय साळी, इकोपेडलर संस्था, अविरत श्रमदान संस्था आदींसह सायकल प्रेमी व पर्यावरण प्रेमी मोठया संख्येने सायकल फेरीमध्ये सहभागी झाले होते. सायकल फेरीमध्ये सहभागी झालेल्यांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले.

Environment Day : नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा – अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे

यावेळी बोलताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छाग्रह उपक्रमांतर्गत विविध अभियान आणि मोहिम राबविल्या जात आहेत. नागरी सहभाग वाढावा तसेच स्वच्छतेची चळवळ अधिक व्यापक व्हावी, याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अनुषंगाने पर्यावरण दिन आणि सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल फेरीद्वारे नागरिकांना स्वच्छतेविषयी तसेच पर्यावरणाविषयी प्रबोधन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात निरंतर प्लॉगेथॉन मोहिम राबवून कचरा संकलन केला जात आहे. तसेच प्लास्टीक मुक्त शहर करण्यासाठी नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे. पर्यावरणाचा (Environment Day) आपल्या जीवनमानावर परिणाम होत असतो. पर्यावरणाचा समतोल राखल्यास मानवी जीवन सुखकर होईल, त्यामुळे वसुंधरेचे रक्षण करून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे, असेही आयुक्त राजेश पाटील यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.