Vijay Shivtare : विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

एमपीसी न्यूज – पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सामना या वृत्तपत्रातून म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून सतत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्ट्या करण्याचे सत्र शिवसेनेत सुरू आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेतल्याचं यावरून दिसून येत आहे. 

 

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार, विजय शिवतारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. विजय शिवतारे  (Vijay Shivtare) हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत होते. शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वीच आपण शिंदे गटात जात असल्याचा निर्णय जाहीर केला होता.

 

 

Ajit Pawar : जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवड लोकशाहीला मारक : अजित पवार

 

 

विजय शिवतारे यांच्या या हकालपट्टीनंतर पुरंदर तालुक्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. शिवतारे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुरंदर तालुक्यातील इतर शिवसैनिक आणि शिवतारे समर्थक यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.