Chinchwad : दारुड्या मुलाने केला वडिलांचा खून 

एमपीसी न्यूज – दारुड्या मुलाने वडिलांच्या डोक्यात पाण्याचा भरलेला हंडा घालून खून केला. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री आठच्या सुमारास वेताळनगर, चिंचवड येथे घडली. 

तानाजी सदबा सोलंकर (वय 55, रा. मोरया हाऊसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर, संजय तानाजी सोलंकर (वय 30) असे संशयित मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रविवारी सायंकाळी दारु पिऊन घरी आला. त्यावेळी मयत तानाजी आणि संजय यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून संजय याने पाण्याने भरलेला हंडा तानाजी यांच्या डोक्यात घातला. शेजाऱ्यांनी तानाजी यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.