Dighi News : च-होली डोंगरावर आढळले स्त्री जातीचे अर्भक

एमपीसी न्यूज – च-होली येथील डोंगरावर एक स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) सकाळी पावणे आठ वाजता उघडकीस आली.

याबाबत पोलीस शिपाई किसन बन्सी लोंढे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटे वस्ती आळंदी रोड येथील च-होली डोंगरावर अज्ञातांनी स्त्री जातीचे अर्भक सोडले. हे अर्भक केवळ एक दिवसाचे आहे. उघड्यावर, असुरक्षितपणे सोडून अज्ञातांनी त्याचा परित्याग केला आहे. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

दिघी परिसरात 29 जानेवारी रोजी देखील एक स्त्री जातीचे अर्भक सापडल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी आणखी एक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.