Petrol-Diesel Prise : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सहा दिवसात पाचव्यांदा वाढ; जाणून घ्या आजचे दर

एमपीसी न्यूज – पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील सहा दिवसात तब्बल पाच वेळा पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढल्या आहेत. महाराष्ट्रात आज (रविवारी, दि. 27) पेट्रोल 113.88 रुपये तर डीझेल 98.13 रुपये या दराने मिळणार आहे.

मागील एका आठवड्यात पेट्रोल 3 रुपये 70 पैसे तर डीझेल 3 रुपये 75 पैशांनी वाढले आहे. गेल्या सहा दिवसात पाच वेळा इंधनाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल 52 पैसे प्रती लिटर तर डिझेल 57 पैसे प्रती लिटर प्रमाणे वाढले आहे.

3 नोव्हेंबर 2021 पासून देशात पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. दरम्यान पाच राज्यात निवडणुका झाल्या. या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याचे संकेत अनेक जाणकारांनी दिले. निवडणुका झाल्यानंतर ते संकेत खरे ठरले आहेत. साडेचार महिन्यानंतर 22 मार्च 2022 पासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले असल्याने भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.