Wakad : हॉटेलसाठी कर्ज आणि लायसन्स काढून देण्याच्या बहाण्याने महिलेची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज – हॉटेल व्यवसायासाठी लागणारे कर्ज, फूड लायसन्स, शॉप अॅक्ट लायसन्स रजिस्टर अग्रीमेंट काढून देण्याच्या बहाण्याने एकाने महिलेची साडेबारा हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 मार्च पासून 18 नोव्हेंबर 2020 या कालावधीत डांगे चौक, वाकड येथे घडली.

अवधूत संभाराव मगर (रा. डांगे चौक, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सुवर्णा बापू ओव्हाळ (वय 35, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी बुधवारी (दि. 18) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुवर्णा ओव्हाळ यांना हॉटेल व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्यांना कर्ज हवे होते. दरम्यान आरोपी अवधूत याने सुवर्णा यांच्याशी संपर्क साधून त्यांना हॉटेल व्यवसायासाठी लागणारे कर्ज काढून देतो, तसेच फूड लायसन्स, शॉप अॅक्ट लायसन्स, रजिस्टर अग्रीमेंट इत्यादी कागदपत्रे सुपर फास्ट सर्व्हिसेस या कार्यालयातून काढून देतो असे सांगितले. कर्ज काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवून देण्याचे सांगून सुवर्णा यांच्याकडून 12 हजार 500 रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांना कर्ज आणि कागदपत्रे काढून न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.