Pimpri News : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या ‘व्हायरल’ यादीत माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचे नाव

एमपीसी न्यूज – विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती सुमारे दोन वर्षांपासून रखडली आहे. असे असताना एक पत्र व्हायरल झाले असून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत सहा नावांची शिफारस केल्याचे या पत्रातून दिसत आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचेही नाव आले आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिफारशींचे हे पत्र बनावट असल्याचे राजभवनाने स्पष्ट केले आहे.

बारा आमदारांच्या नियुक्तीपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल एक कथीत पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रातून विधान परिषदेसाठी राज्यपालांकडून 6 नावांची मुख्यमत्र्यांकडे शिफारस करण्यात आली आहे. बारापैकी सहा जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे हे पत्र 29 सप्टेंबर 2020 रोजी लिहिले होते.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी वीरभद्रेश करबसव्वा बसवंती, रमेश बाबुराव कोकाटे, सतीश रामचंद्र घरत, संतोष अशोक नाथ, मोरेश्वर महादू भोंडवे, जगन्नाथ शिवाजी पाटील या नावांचा समावेश आहे. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची राजकीय क्षेत्रातून विधानपरिषदेवर नियुक्ती केल्याचे या व्हायरल पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.