Burglary at Karla : कार्ला येथे चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कार्ला (Burglary at Karla) येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून चार लाख नऊ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 29 मे ते 2 जून या कालावधीत घडली.

विजय शंकर जाधव (वय 62, रा, कार्ला, ता. मावळ) यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कार्ला (Burglary at Karla) येथील घर 29 मे ते 2 जून या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून एक लाख 35 हजारांचे तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, एक लाख 35 हजारांचा सोन्याचा राणीहार, 45 हजारांचे सोन्याचे नेकलेस, 45 हजारांची सोन्याची चेन, 22 हजार 500 रुपयांची सोन्याची अंगठी, 13 हजार 500 रुपयांची सोन्याची नथ, 12 हजारांचा चांदीचा कंबरपट्टा, 1100 रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख नऊ हजार 100 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.