Chinchwad : हिंजवडी, सांगवी, पिंपरी, चाकण मधून चार वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – हिंजवडी, सांगवी, पिंपरी आणि चाकण परिसरातून चार वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्यामध्ये एका पिकअपचा देखील समावेश आहे. याबाबत रविवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश गुलाब दहिगावे (वय 22, रा. माले, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दहिगावे यांची 45 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 12 / पी जे 3806) 30 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे दहा वाजता वाकड रोड हिंजवडी येथे टिव्हीएस शोरूम समोर पार्क केली होती. दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी दुचाकींची लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

सुमित चंपालाल प्रतापजी (वय 22, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रतापजी यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एफ क्यू 6897) घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार 31 ऑक्टोबर रोजी उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

सुरज नामदेव पंगुडवाले (वय 30, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज यांची 20 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / सी वाय 8282) अज्ञात चोरट्यांनी बसवेश्वर चौक, मोहननगर येथून चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

विठ्ठल काशीनाथ घोगरे (वय 50, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  घोगरे यांची 1 लाख 50 हजार रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी (एम एच 14 / ए एस 4466) अज्ञात चोरट्यांनी खराबवाडी येथील एका कंपनीसमोरून चोरून नेली. हा प्रकार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.