Pune Crime News : शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दरोडा टाकणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद

एमपीसी न्यूज – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र वर 21 ऑक्टोबर रोजी भरदिवसा पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. यामध्ये तब्बल दोन कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्यातील दरोडेखोरांना पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. 

21 ऑक्टोबर रोजी भरदिवसा पाच सशस्त्र दरोडेखोरांनी पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये प्रवेश केला. त्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून दोन कोटी रुपये किमतीचे सोने आणि रोख 31 लाख रुपये घेऊन हे चोरटे पसार झाले होते. भरदिवसा पडलेल्या या जबरी तरुणाने पुणे जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यानंतर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले होते.

या गुन्ह्याच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी दहा वेगवेगळी पथके तयार केली होती. ही पथके तपास करत असताना त्यांना यातील मुख्य सूत्रधार पारनेर तालुक्यातील असल्याचे समजले. पोलिसांनी त्यातील काही आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपींची नावे आणि गुन्ह्याचा तपशील ग्रामीण पोलीस आज सायंकाळी पत्रकार परिषदेत देणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.