Pune News : ‘लग्न लावून द्या अन्यथा आत्महत्या करेन’ पोलीस उपनिरीक्षक तरुणी सोबत लग्न करण्यासाठी तरुणाची धमकी

एमपीसी न्यूज : पोलीस उपनिरीक्षक असलेल्या तरुणीसोबत ‘लग्न लावून द्या अन्यथा आत्महत्या करेन’ अशी धमकी देऊन तरुणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांचे एकत्र असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका तरुणाविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी तरुणी ही पुणे पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. 

सिद्धांत भगवानराव जावळे (वय 30, रा. माजलगाव बीड) असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुणे पोलिस दलात काम करणाऱ्या 28 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादी तरूणीचा मित्र आहे. तो फिर्यादी व सतत संशय घेत असल्यामुळे, शिवीगाळ आणि मारहाण करत असल्यामुळे फिर्यादीने तिला सोबत लग्न करण्यास नकार दिला होता. तरीही आरोपी फिर्यादीच्या नातेवाईकांना फोन करून लग्न लावून द्या नाही तर मी आत्महत्या करेन, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी द्यायचा. तसेच आरोपीने दोघांचे एकत्र असलेले फोटो फेसबुक यूट्यूब व्हाट्सअप वर भांडण करून फिर्यादीचे बदनामी करण्यासाठी प्रयत्न केला.

आरोपीने फिर्यादीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन तुझी नोकरी सोडून दे, मला तुझा पाच वर्षाचा पगार दे किंवा आताच्या आता माझ्याशी लग्न कर असे म्हणून वेळोवेळी फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची किती घालून तिच्याकडून अनेकदा पैसे घेतले आहेत. या सर्व प्रकाराला कंटाळून फिर्यादीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी केल्यानंतर लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.