Vadgaon Maval : ग्रामपंचायत हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – ग्रामपंचायत हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे. ग्रामविकासाचा पाया रचणा-या माजी सरपंचांचा नितीन मु-हे आणि त्यांचे सहकारी गावोगावी जाऊन सत्कार करत आहेत, हा उपक्रम कौतुकास्पद आहे. जनतेच्या मूलभूत समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न सर्व ज्येष्ठ माजी सरपंचांनी केला आणि गावाचे गावपण, एकोपा टिकवून ठेवला. त्यामुळे अनेक गावे आदर्श ग्राम बनली असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले. 

वडगाव मावळ- सोमाटणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नितीन मुऱ्हे यांच्या वतीने पवन मावळ मधील ग्रामपंचायतीत पद भूषविलेल्या गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या आजी-माजी सरपंच, उपसरपंचांचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात येणार होता. या उपक्रमाची सुरुवात उर्से ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंचाचा सन्मान करुन करण्यात आली. वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे काल (दि. 31 जाने.) उर्से ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंचाचा सत्कार समारंभ पार पडला, या प्रसंगी आमदार शेळके बोलत होते.

या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष, नगरसेवक गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, संजय गांधी समिती अध्यक्ष श्री.नारायण ठाकर, राष्ट्रवादी काँग्रेस पु.जि. उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, युवक कार्याध्यक्ष सुनिल भोंगाडे, उत्तम घोटकुले, उपसरपंच सचिन मुऱ्हे, मनोज येवले, भरत भोते, दत्ता ओझरकर, प्रवीण मुऱ्हे, राकेश घारे आदि.मान्यवर तसेच उर्से ग्रामपंचायत आजी-माजी सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

वडगाव मावळ येथील सत्कार समारंभप्रसंगी मावळचे आमदार सुनिल शेळके बोलताना म्हणाले, गावाच्या जडणघडणीत सरपंच, उपसरपंच यांचे योगदान आहे. गावची धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक ओळख जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

ग्रामपंचायत हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे. हे समजुन ग्रामविकासाचा पाया ज्येष्ठ व्यक्तींनी रचला आहे.जनतेच्या मुलभुत समस्या जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न सर्व ज्येष्ठ माजी सरपंचांनी केला आणि गावाचे गावपण, एकोपा टिकवून ठेवला. त्यामुळे अनेक गावे आदर्श ग्राम बनली, त्यांच्या या योगदानाचा आदरपूर्वक सन्मान प्रत्येक गावात जाऊन नितीन मुऱ्हे आणि त्यांचे सहकारी करणार आहेत.त्यांचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार आमदार शेळके यांनी काढले.

याप्रसंगी आमदार शेळके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व माजी सरपंचांचा सत्कार छत्रपती शिवाजीमहाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींच्या प्रतिमा आणि सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मु-हे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.