23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Rajesh Patil : शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांना अभिवादन

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil)  यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, मनोज माछरे, नितीन समगीर, अभिमान भोसले, रामदास कटके, विष्णू गवारी, आसिफ शेख, अंकुश लांडगे, संजय शिंदे आदी उपस्थित होते.

Pune Metro : मेट्रो धावणार आता हडपसर, पुलगेटपर्यंत

 

लोकसभेचे खासदार, विधानसभेचे चार वेळा आमदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास यशस्वीपणे पूर्ण केलेले अण्णासाहेब मगर यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांनी ४ मार्च १९७० रोजी पिंपरी चिंचवड नगरपालिकेची स्थापना केली आणि नगरीच्या विकासाचा प्रवास खऱ्या अर्थानी सुरु झाला. कृषी क्षेत्रातील पदवी घेतलेल्या अण्णासाहेबांनी थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांनी १२ मार्च १९७२ रोजी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण तसेच पिंपरी चिंचवड औघोगिक नगरी करण्यासाठी महाराष्ट्र औघोगिक विकास महामंडळासारख्या अनेक संस्था त्यांच्या कारकिर्रीत सुरु झाल्या.

spot_img
Latest news
Related news